विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वास यामध्ये सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. आमच्या अनुभवी शिक्षकांच्या टीमने इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील आव्हानांसाठी उत्कृष्टपणे कसा सामोरा जाऊ शकेल हे सुनिश्चित करून सर्व आवश्यक विषयांचा एक सर्वसमावेशक अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार केला आहे.
सातत्यपूर्ण सराव हा स्पर्धा परीक्षा यशाचा आधारस्तंभ आहे आणि तेच आम्ही आकर्षक आणि प्रभावी बनवतो. आमच्या प्लॅटफॉर्मवर दैनंदिन प्रश्नमंजुषा ( Daily Quiz ) आहेत ज्या अनुभवी शिक्षकांनी तयार केलेल्या लेसन्स वर आधारित असतात. प्रत्येक प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांना विषयाच्या प्रत्येक स्तरावर आव्हान देण्यासाठी डिझाइन केलेली आहे, ज्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि विषयाबद्दलची समज वाढविण्यात मदत होईल. प्रशमंजुषेनंतर येणाऱ्या त्वरित अभिप्राय आणि तपशीलवार स्पष्टीकरणांसह, विद्यार्थी त्यांच्या चुकांमधून शिकू शकतात आणि सुधारणा करू शकतात. आमच्या प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांना एक मजेशीर अनुभव देतात आणि अभ्यासात होत असलेली प्रगती दर्शवतात.
EXPLOREFocussed learning with interactive and fun live sessions
Learn what you need the most. We’ll curate it, especially for you
Solve problems and prepare for the real world ahead of you
Learn in group, perform activities, take up challenges
आमचा विश्वास आहे की शिक्षण हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील समतोल भागीदारी आहे. आम्ही या पोर्टलद्वारे हि भागीदारी आणखी सोपी करून देत आहोत जेथे विद्यार्थी त्यांच्या स्वत:च्या गतीने प्रगती करू शकतात, तर पालक त्यांच्या मुलाच्या शैक्षणिक प्रवासात त्यांना मदत करू शकतात. लर्निफाय अकॅडमी विद्यार्थ्यांना तपशीलवार कार्यप्रदर्शन अहवाल प्रदान करते, ज्यात विध्यार्थ्यांचे सामर्थ्य आणि गरजेच्या सुधारणा या दोन्ही गोष्टी अधोरेखित होतात. ज्याद्वारे शिक्षक विदयार्थी आणि पालक यांमध्ये पारदर्शकता येते. आम्ही पालकांना स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत दिशा दर्शक म्हणून मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.